
*बोगस कोल्हापुरी चप्पलचा सुळसुळाट वाढल्याने त्याला आळा घालण्यासाठी लिडकॉमने कोल्हापुरी चपलांना ‘क्यूआर’ कोड दिला*
___अतिशय जुनी ओळख असलेली कोल्हापुरी चप्पल म्हणजे कोल्हापूरची शान आहे. मात्र, असे असले तरी बाजारात बोगस कोल्हापुरी चप्पलचा सुळसुळाट वाढल्याने त्याला आळा घालण्यासाठी लिडकॉमने नवा प्रयोग राबवून कोल्हापुरी चपलांना ‘क्यूआर’ कोड दिला आहे.ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारित चपलेत छोटी चीप बसवली असून चपलेला मोबाईलने स्कॅन करताच त्या चपलेची संपूर्ण माहितीच उपलब्ध होते. त्यामुळे आता मोबाईलच्या एका क्लिकवर कोल्हापुरी चप्पल असली की नकली हे सहज ओळखता येणार आहे. चपलांमध्ये असे तंत्रज्ञान जगात प्रथमच वापरले गेले आहे.www konkantoday.com