
देशातील संविधान नष्ट करण्याचा भाजपचा डाव, उल्का महाजन यांची टीका
हजारो कोटींचा इलेक्ट्रोरल बॉण्ड घोटाळा हा भाजपा सरकारने केलेला जगातील सर्वात मोठा घोटाळा असून महागाई, बेरोजगारीने सर्वसामान्य जनतेला उध्वस्त करून या देशातील संविधान नष्ट करण्याचा कुटील डाव भाजप सरकार करीत आहे. त्यामुळे देशातून भाजप सरकारला तडीपार केले तरच हा देश वाचेल, अशी घणाघाती टीका ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन यांनी लांजा येथील निर्भय बनो, भारत जोडोच्या सभेत व्यासपीठावरून केली.निर्भय बनो, भारत जोडो, निर्धार महाराष्ट्राचा या अभियानांतर्गत शुक्रवारी सायंकाळी लांजा शहरात मुंबई-गोवा महामार्गालगत सहकारी सोसायटीसमोरील मैदानात जाहीर सभा घेण्यात आली. यावेळी प्रमुख वक्ते उल्का महाजन व दिलीप सोळंके यांनी मोदी सरकारवर ताशेरे ओढले.www.konkantoday.com