गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणीचाDNA झाला मॅच, राजकोटमध्ये अंत्यसंस्कार होणार


अहमदाबाद विमान दुर्घटनेत मृत्यू झालेले गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या मृतदेहाची ओळख पटली आहे. रुपाणी यांचा डीएनए जुळला असून त्यांचा मृतदेह कुटुंबियांकडे सोपावला जाणार आहे.विजय रुपाणी यांच्यावर राजकोटमध्ये अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती गुजरातचे गृहमंत्री हर्ष सांघवी यांनी दिली.

हर्ष सांघवी म्हणाले की, गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचं १२ जून रोजी अहमदाबाद विमान दुर्घटनेत निधन झालं. त्यांची डीएनए चाचणी मॅच झाल्याची माहिती सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास मिळाली. आता त्यांच्या कुटुंबियांकडे पार्थिव सोपवलं जाणार आहे.

गुजरातचे आरोग्यमंत्री म्हणाले की, मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल हे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या निवासस्थानी गेले आहेत. त्यांच्या कुटुंबियांना डीएनए मॅच झाल्याची माहिती देण्यात आलीय. राजकोटमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कारासाठी राज्य सरकार सहकार्य करेल. कुटुंबातील सदस्य त्यांचे पार्थिव कधी घ्यायचं आणि कसे अंत्यसंस्कार करायचे हे ठरवतील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button