मुंबई-गोवा महामार्गावरील भरणे येथील नव्या जगबुडी पुलावर मालवाहू ट्रक दुभाजकावर आदळला

मुंबई-गोवा महामार्गावरील भरणे येथील नव्या जगबुडी पुलावर अपघातांची मालिका सुरूच आहे. रविवारी सकाळी ७.३० च्या सुमारास मालवाहू ट्रक दुभाजकावर आदळून अपघात घडला. हा ट्रक दुभाजकावर उलटा होण्याच्या स्थितीत असल्याने पोलीस तैनात करून एकेरी वाहतुकीचा अवलंब करण्यात आला.के.ए. २२ डी ७९६१ क्रमांकाचा मालवाहू ट्रक मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाात असताना नव्या जगबुडी पुलावर आला असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक थेट दुभाजकावर आदळला. ट्रकचा उजव्या बाजूकडील पुढील टायरही निखळला. ट्रक दुभाजकावर मध्यभागी उभा राहिल्याने रस्त्यावर कोसळण्याचा धोका लक्षात घेवून २ पोलीस कर्मचारी तातडीने तैनात करण्यात आले. पुलावरून एकेरी वाहतूक सुरू होती. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button