
हे केवळ भाजपचं ‘संकल्प पत्र’ नाही तर मोदीजींची गॅरंटी आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने काल आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. या जाहीर नाम्याला भाजपने मोदींची गॅरंटी असे नाव दिले आहे. याच जाहीरनाम्याविषयी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे केवळ भाजपचं ‘संकल्प पत्र’ नाही तर मोदीजींची गॅरंटी आहे. देवेंद्र फडणवीस हे आज सकाळी नागपुरात बोलत होते. त्यांनी यावेळी, पुढची पाच वर्ष 80 कोटी नागरिकांना रेशन मोफत देण्याचा संकल्प आहे. 70 वर्षावरील नागरीकांना युनिव्हर्सल मोफत उपचार देण्याचा निर्णय झाला आहे. तृतीयपंथींयाचाही आयुषमान भारतमध्ये समावेश करण्यात आला आहे. सिलेंडरची पद्धत्त कालबाह्य करुन पाईपने गॅस देण्याचा निर्धार आहे. एक कोटी घरांना सोलरची सयंत्र देऊन त्याचं विजेचं बील मोफत करणार आहे. मुद्रा योजनेत 60 टक्के महिलांना त्याचा लाभ मिळाला आहे. अशी माहिती पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे. या वेळी चंद्रशेखर बावनकुळेही उपस्थित होते.www.konkantoday.com