
दिव्यांग कर्मचार्यांना निवडणूक कामातून वगळण्यासाठी दिव्यांग समन्वय समिती आणि दिव्यांग कर्मचारी संघटनेची विनंती
दिव्यांग कर्मचारी तसेच स्तनदा माता, गरोदर स्त्रिया आणि तत्सम कर्मचार्यांना या निवडणूक कामात सामावून न घेण्याच्या निवडणूक आयोगाच्या सूचना आहेत. मात्र असे असतानाही जिल्ह्यातील ३५० हून अधिक दिव्यांग कर्मचार्यांना निवडणूक कामातून वगळण्यासाठी दिव्यांग समन्वय समिती आणि दिव्यांग कर्मचारी संघटनेने विनंती केली आहे.मात्र अनेक विभागातून आपला कर्मचारी दिव्यांग असल्याचेच न कळवल्याने अनेक दिव्यांगांना निवडणूक कामात समाविष्ठ करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून आलेल्या यादीत कर्मचार्यांची दिव्यांग म्हणून ओळखच नसल्याचे बोलले जात आहे. या कामी घेतल्याबाबत महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी संघटनेने जिल्हा निवडणूक अधिकारी यांना निवेदन दिले आहे.www.konkantoday.com