
खेर्डी अनैतिक व्यवसाय प्रकरणी आणखी तिघांना अटक ,संशयितांची संख्या सातवर पोहोचली
चिपळूण तालुक्यातील खेर्डी येथे उघड झालेल्या अनैतिक व्यवसाय प्रकरणी चिपळूण पोलिसांनी शुक्रवारी आणखी तिघांना अटक केली आहे. यामध्ये दोन महिलांसह एका प्रौढाचाही समावेश आहे. त्यामुळे या प्रकरणात आतापर्यंत अटक करण्यात आलेल्या संशयितांची संख्या सातवर पोहोचली असून अटक केलेला संशयित खेड येथील असल्याने या प्रकरणाचे कनेक्शन चिपळूण तालुक्याबाहेरही असल्याचे बोलले जात आहे.
ताराचंद थिटे (४६, रा. सुकवली खेड) असे अटक झालेल्या संशयिताचे नाव आहे. त्याचेसोबतच दोन महिलांनाही अटक करण्यात आली आहे. नोकरीच्या आमिषाने पश्चिम बंगाल येथील मुलींना अनैतिक व्यवसायास भाग पाडून लैगिंक अत्याचार केल्याचा प्रकार हेल्प फाऊंडेशनने चिपळूण पोलिसांच्या मदतीने उघड केला होता.
konkantoday.com