
कन्झ्युमर्स शॉपी प्रदर्शन १७ पासून रत्नागिरीत कन्झ्युमर्स
शॉपी हे गृहोपयोगी वस्तूंचे भव्य प्रदर्शन रत्नागिरी शहरातील पटवर्धन हायस्कूलच्या मैदानावर १७ ते २१ एप्रिल या कालावधीत आयोजित केले आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन रत्नागिरी वकील संघाचे माजी अध्यक्ष वरिष्ठ वकील अशोक कदम यांच्या हस्ते होणार आहे. या वेळी स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळाचे कार्याध्यक्ष जयंत देसाई हे उपस्थित राहणार आहेत.या वस्तू प्रदर्शनात टीटीके प्रेस्टिज, निर्लेप, वाघबकरी चहा, युरेका फोर्बेज, पितांबरी, प्रवीण मसालेवाले, गोविंद मिल्क, सवाई मसाले, सनप्युअर ऑईल, ऑलिव्हिया, मिल्टन, सेलो, नॅनोनाईन, हेम कॉर्पोरेशन, मिल्क-ओ-मिक्स, चाकोटे फूड्स, अनन्या क्रीएशन, वाटन कंपनी, जीनिअस हेल्थकेअर सेंटर, प्रथम पेस्ट कंट्रोल, मिथ परफ्युम्स, रूपम चुरण, श्री गणेश बेकरी नंदानी प्रा. लि., स्टेप इन वॉक शूज, भावना एन्टरप्रायझेस, शीलाताई फूड्स, धागा कलेक्शन, आयरिस कलेक्शन, भिडे बेकरी, मायलेकी, मोहक क्रीएशन, आयुष फूड, महालक्ष्मी एन्टरप्रायझेस, स्पर्श कलेक्शन, रमा क्लेक्शन, मॅजिक क्लॉथ, साईकृपा लघुद्योग, शुभश्री, कौमुदी ज्वेलर्स, कम्प्युटर अॅकॅडमी, मंच्युरियन मसाले, सिबिलाज, देवरूख लखनवी, कौसर सॉक्स, प्रणाद कलेक्शन, संगीता गाऊन्स, पाँडिचेरी बेड, ५ डी फोटो, विकास लेदर, रामेश्वर इंडस्ट्रिज, नक्षत्र, गुजरात नमकिन, शलाका बॅग्ज, आर्च होजिअरी, राजस्थान पिकल्स आदी अनेक नामांकित कंपन्यांचा सहभाग असून या कंपन्यांबरोबरच महिला व लघुद्योजकी मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले आहेत. www.konkantoday.com