अखिल भारतीय नाट्य परिषदेची चिपळूण शाखा २० वर्षानंतर पुन्हा सुरू

अखिल भारतीय नाट्य परिषदेची चिपळूण शाखा २० वर्षानंतर पुन्हा सुरू करण्यात करण्यात आली.या नवीन शाखेचे उद्घाटन गुरूवारी सायंकाळी इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रामध्ये पार पडले.या वेळी झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत एकमताने कार्यकारिणीची निवड करण्यात आली. कार्यकारिणीमध्ये अध्यक्ष डॉ. प्रशांत पटवर्धन, कार्याध्यक्ष दिलीप आंब्रे, प्रमुख कार्यवाह डॉ. मीनल ओक, सहकार्यवाह संजय कदम, उपाध्यक्ष योगेश बांडागळे, उपाध्यक्ष भाऊ कार्ले, खजिनदार ॲड. विभावरी रजपूत, कार्यकारिणी सदस्य मंगेश बापट, श्रीकांत फाटक, योगेश कुष्टे, अमरदीप परचुरे, छाया पोटे, ओंकार रेडीज, विभावरी जाधव, अभय दांडेकर यांचा समावेश आहे.पंचवार्षिक निवडणूक व शाखेच्या उद्घाटनप्रसंगी चिपळूण शाखेचे सदस्य उपस्थित होते. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्यावतीने निरीक्षक म्हणून रत्नागिरी शाखेचे कार्याध्यक्ष समीर इंदुलकर उपस्थित होते. निवडणूक निरीक्षक समीर इंदुलकर यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा झाली. निवडप्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर समीर इंदुलकर यांनी या सभेमध्ये नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांची घोषणा केली. या सभेला डॉ. मिलिंद गोखले, प्रकाश काणे, संतोष केतकर, अल्हाद वरवटकर, गणेश शिंदे, कांता कानिटर, अविनाश जोशी, विजय परचुरे, अमरदीप परतुरे, महेश पवार आदी उपस्थित होते. रत्नागिरी शाखेचे कार्याध्यक्ष समीर इंदुलकर, सदस्य आणि लोककलावंत सुनील बेंडखळे यांनी नवीन पदाधिकाऱ्यांना व नव्या शाखेला शुभेच्छा दिल्या.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button