खासदार म्हणून लोकसभा मतदारसंघाचा विकास करण्यासाठी विनायक राऊत सपशेल “फेल” ठरले -भाजपचे नेते आशिष शेलार
खासदार म्हणून लोकसभा मतदारसंघाचा विकास करण्यासाठी विनायक राऊत सपशेल “फेल” ठरले आहेत. त्यामुळे उमेदवारी कधीही जाहीर झाली तरी राऊत यांचा पराभव निश्चित आहे, असा दावा भाजपचे नेते आशिष शेलार यांनी केला.सिंधुदुर्ग दौऱ्यावर असलेल्या आशिष शेलार यांनी सावंतवाडीत पत्रकारांशी संवाद साधला. येथे केला. दरम्यान राजन तेली यांनी स्टेटस द्वारे व्यक्त केलेली नाराजी ही त्यांची भावना आहे. ते प्रामाणिक कार्यकर्ते आहेत. त्यामुळे त्यांनी आपली भावना व्यक्त केली तर त्यात काय बिघडले? असाही उलट सवाल त्यांनी उपस्थित पत्रकारांना केला. शेलार हे सिंधुदुर्ग दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी सावंतवाडी येथे येवून पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, माजी नगराध्यक्ष संजू परब, जिल्हा बँकेचे संचालक महेश सारंग, रवी मडगावकर, शहर अध्यक्ष अजय गोंदावळे, दिलीप भालेकर, केतन आजगावकर, अमित परब आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी शेलार म्हणाले की, येत्या २ दिवसात महायुतीचा अधिकृत उमेदवार जाहीर करण्यात येणार आहे. त्या ठिकाणी काही झाले तरी महायुतीचा उमेदवार निवडून येणार आहे. त्याला निवडून आणण्यासाठी येथील भाजपचे कार्यकर्ते शर्थीचे प्रयत्न करणार आहेत. जास्तीत-जास्त मताधिक्य मिळावे यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. www.konkantoday.com