
असंख्य चिमुकल्यांनी लिहिली पालकांना पत्रे मतदान जाणीव जागृतीसाठी दापोलीत असाही उपक्रम
संगलट( खेड)( प्रतिनिधी ) येऊ घातलेल्या लोकसभा निवडणूकीसाठी मतदानात वाढ व्हावी यादृष्टीने मुख्य निवडणूक निर्णयाधिकारी एम देवेंदर सिंह यांच्या प्रेरणेने सहा.निवडणूक निर्णयाधिकारी डाॅ.अजीत थोरबले;आणि तहसिलदार अर्चना बोंबे यांच्या मार्गदर्शनाने स्विप उपक्रमाचे नोडल अधिकारी तथा गटशिक्षणाधिकारी अण्णासाहेब बळवंतराव 263 दापोली मतदार संघात विविध उपक्रम राबवित आहेत.आज दापोली तालुक्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमधून असंख्य चिमुकल्यांनी मतदान जाणीव जागृतीसाठी आपल्या पालकांना चक्क पत्रे लिहून प्रबोधन केले.लोकशाही बळकटीकरण करणेसाठी महामानव डाॅ.बाबासाहेबांनी संविधानाद्वारे दिलेल्या मतदानाचा पवित्र हक्क बजावणेकामी चुनावी पाठशाळेतून मुलांनी प्रेरणा घेऊन आपल्या पालकांनी ७ मे रोजी आपल्या पालकांनी मतदान करावे याकरिता चिमुकल्यांनी केला पत्रप्रपंच,ज्याद्वारे मतदानाचा टक्का वाढेल असा विश्वास अण्णासाहेब बळवंतराव यांनी व्यक्त केला.