चिपळूणमध्ये नव्या जॅकवेलच्या कामासाठी ठेकेदार अनुत्सुक
चिपळूण तालुक्यातील गोवळकोटसह अर्ध्या शहराचा पाणीप्रश्न मार्गी लावण्यासाठी गांधारेश्वर येथे बांधल्या जाणार्या जॅकवेल कामाला ठेकेदार अनुत्सुक असल्याचे दिसून येत आहे. यासाठी नगर परिषदेने राबवलेल्या निविदा प्रक्रियेला एकाच ठेकेदाराने प्रतिसाद दिला. नियमानुसार कमीत कमी तीन निविदा येणे अपेक्षित असते. त्यामुळे आता ८ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे.पूर्वी वाशिष्ठी नदीला भरपूर पाणी येत असल्याने गोवळकोट येथे असलेल्या नगर परिषदेच्या जॅकवेलमधून गोवळकोट, गोवळकोट रोड, उक्ताड, बाजारपेठ व पेठमाप येथील नागरिकांना मुबलक पाणी देणे सहज शक्य होते. मात्र गेल्याा काही वर्षापासून पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. तसेच कोयनेत वीजनिर्मिती कमी होत असल्याने नदीत सोडल्या जाणार्या प्रमाणही कमी झाले आहे. त्यामुळे गोवळकोट येथील जॅकवेल समस्यांच्या गर्तेत अडकली असून या जॅकवेलकडे वाशिष्ठी नदीचे पाणीच जात नसल्याने खाडीचे भरतीचे पाणी जॅकवेलमध्ये येत असल्याने अधूनमधून वरील भागांना खारट, मचूळ व गढूळ पाण्याचा पुरवठा होतो. www.konkantoday.com