लोकसभा निवडणूक कामात प्रशासन गुंतल्याने चिपळुणात २० दिवसात ११ गावांमध्ये टँकर धावलाच नाही
लोकसभा निवडणूक कामात प्रशासन गुंतल्याने आणि राजकीय पक्षांची नेतेमंडळी प्रचाराच्या रणधुमाळीत दंग झाल्याने चिपळूण तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांकडे सर्वांचेच दुर्लक्ष झाले आहे. टंचाईग्रस्त अकरा गावांमधून टँकरच्या मागणीसाठी आलेले अर्ज गेल्या २० दिवसांपासून तहसील कार्यालयात पडून आहेत. प्रशासनाने पाणी उपलब्धतेविषयी संयुक्तीक पाहणीच केलेली नसल्याने या गावात गेल्या २० दिवसात टँकर धावू शकलेला नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.सध्या लोकसभा निवडणूक प्रचाराला जोर चढू लागला असताना दुसरी ग्रामीण भागातील जनता पाणीटंचाईने त्रस्त झाली आहे. गावागावातील नैसर्गिक पाण्याचे स्त्रोत आटले असून नदी, नाल्यांमध्ये खडखडाट झालेला पहावयास मिळत आहे. धरणामधील पाण्यासाठ्यानेही तळ गाठू लागला आहे. कोंडमळ्यासह काही गावात तर भीषण पाणीटंचाई जाणवू लागली आहे. आतापर्यंत सावर्डे, डेरवण, टेरव, कादवड, कोंडमळा, अडरे, अनारी, आगवे, डेरवण या गावांतील काही वाड्यांमध्ये सध्या टँकर धावत आहे. www.konkantoday.com