मी विनाकारण अंगावर जाणार नाही; मात्र जर कोणी माझ्या अंगावर आला तर त्याला आडवा केल्याशिवाय सोडणार नाही-विनायक राऊत
नारायण राणे माझ्यावर आरोप करतात की, मी टोल घेतले आहेत.नारायण राणे यांना माझे आव्हान आहे की, केवळ रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये एक जरी टोल माझ्या नावावर असेल किंवा माझ्या कुटुंबीयांचा असेल तर तो शोधून दाखवा अन्यथा तुमच्या १५ वर्षाच्या कारकिर्दीत सिंधुदुर्गात काय काय झालं तो राणे पिता-पुत्रांचा पंचनामा करायला माझ्याकडे भरपूर मटेरियल आहे; परंतु मी विनाकारण अंगावर जाणार नाही; मात्र जर कोणी माझ्या अंगावर आला तर त्याला आडवा केल्याशिवाय सोडणार नाही, असा घणाघात खासदार विनायक राऊत यांनी राणेंवर केला. www.konkantoday.com