आचारसंहिता लागू झाल्यानंतर देखील या जाहिराती उतरविण्यात न आल्याने एसटी सहायक वाहतूक अधीक्षक निलंबित
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर ४८ तासात एसटीच्या बसेसवरील सरकारी जाहिराती न हटवल्याचा निष्काळजीपणा सहायक वाहतूक अधीक्षक यांना बसला आहे. या प्रकरणी तक्रार झाल्यानंतर जिल्हाधिकारी यांनी सहायक वाहतूक अधीक्षक यांना निलंबित केले आहे.लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर तत्काळ आचारसंहिता लागू करण्यात आली. आचारसंहिता लागू होताच पुढील २४ ते ४८ तासात राजकीय बॅनर, होर्डिंज उतरवण्यासाठी वेळ देण्यात येतो. सरकारी मालमत्तांवर असलेल्या राजकीय जाहिराती उतरवण्यासाठी देखील हाच नियम आहे.रत्नागिरी आगारातील एसटीच्या गाड्यांवर मुख्यमंत्री यांच्या जाहिराती करण्यात आल्या होत्या. मात्र आचारसंहिता लागू झाल्यानंतर देखील या जाहिराती उतरविण्यात न आल्याने याबाबत निवडणूक निर्णयाधिकारी देवेंद्र सिंह यांच्याकडे तक्रार करण्यात आली होतीwww.konkantoday.com