चिपळूण नगर नगरपरिषदेची गांधीगिरी , गोड बोलून वसुली करण्यावर अधिक भर
यावर्षी चिपळूण नगर परिषदेने कारवाई करण्यापेक्षा गोड बोलून गांधीगिरी करत वसुली करण्यावर अधिक भर दिला. त्याचा चांगला परिणाम झाला असून कर वसुली वाढली आहे. मुख्याधिकारी विशाल भोसले स्वतः वसुलीसाठी फिरल्याने त्याचा मोठा फायदा झाला असून यामुळे न वसूल होणारा थकीत करही वसूल झाला आहे. यावर्षी पाणी व मालमत्तांसह अन्य करातून १३ कोटी ६८ लाख ४२ हजार ४७८ रूपयांची वसुली झाली आहे. यामुळे अधिकारी, कर्मचार्यांनी वसुलीसाठी घेतलेली दिवस-रात्रीची मेहनत कामी आली आहे.www.konkantoday.com