
कोकण रेल्वे मार्गावरआरवली ते रत्नागिरी सेक्शनदरम्यान शुक्रवारी अडीच तासांचा ‘मेगाब्लॉक’
कोकण रेल्वेच्या आरवली ते रत्नागिरी सेक्शनदरम्यान दि. १२ एप्रिल २०२४ रोजी अडीच तासांचा मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. रेल्वे मार्गाच्या देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी हा मेगाब्लॉक कोकण रेल्वेकडून घेतला जाणार आहे. या मेगाब्लॉकमुळे कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या लांब पल्ल्याच्या दोन एक्स्प्रेस गाड्या विलंबाने धावणार आहेत. यापैकी दिल्लीला जाणारी आणि दररोज धावणारी मंगला एक्स्प्रेस १ तास ४५ मिनिटे मेगाब्लॉक चालणाऱ्या भागाच्या आधी रोखून ठेवण्यात येणार आहे.या संदर्भात कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, रेल्वे मार्गाच्या देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी दि. १२ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ७ ते सकाळी ९.३० असा अडीच तासांचा मेगाब्लॉक घेतला जाणार आहे.कोकण रेल्वे मार्गावरील या मेगाब्लॉकमुळे एर्नाकुलम ते हजरत निजामुद्दीन (१२६१७) अशी दैनंदिन धावणारी दि. ११ रोजी प्रवासाला निघणारी मंगला एक्सप्रेस दि. १२ रोजी मडगाव ते रत्नागिरी दरम्यान १ तास ४५ मिनिटे रोखून ठेवली जाणार आहे. मंगला एक्सप्रेसबरोबरच हे तिरूनेलवेली ते गांधीधाम (२०९२३) दरम्यान धावणारी लांब पल्ल्याची एक्स्प्रेस गाडी जिचा प्रवास ११ एप्रिल रोजी सुरू होतो ती दि. १२ एप्रिल रोजी मडगाव ते रत्नागिरी दरम्यान १ तास १० मिनिटे रोखून ठेवली जाणार आहे.www.konkantoday.com