
रत्नागिरी शहरानजिकच्या कर्ला गावची सुकन्या सुरभि अभ्यंकरची अमेरिकेत लक्षवेधी कामगिरी.
रत्नागिरी शहरानजिकच्या कर्ला गावची सुकन्या सुरभि दीपक अभ्यंकर यांनी अमेरिकेतील इंडियाना युनिर्व्हसिटी स्कूल ऑफ मेडिसिन इंडियानापोलीस, इंडियाना (युएसए) येथून जैव रसायनशास्त्र आणि आण्विक कामगिरी केली आहे.सुरभिच्या शैक्षणिक प्रवासाची सुरूवात फाटक हायस्कूल रत्नागिरी येथून झाली. त्यानंतर तिने गोगटे जोगळेकर महाविद्यालयातून सूक्ष्मजीवशास्त्र विषयात पदवी आणि मुंबई विद्यापीठातून (कलिना, सांताक्रूझ, मुंबई) जीवभौतिकशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी मिळवली. त्यानंतर सुरभिने केईएम हॉस्पिटलमध्ये नैदानिक संशोधन समन्वयकाची नोकरी मिळवली.
संशोधनाची तीव्र आवड असल्याने सुरभिने अमेरिकेत डॉक्टरेट शिक्षण घेण्याचे ध्येय ठेवले. तिने केलेल्या कष्टाला यश येत तिला अमेरिकेतील सहा विद्यापीठांकडून प्रवेशाची ऑफर मिळाली. शेवटी सुरभिने इंडियाना युनिर्व्हसिटीची निवड केली.तिचे संशोधन अल्झायमर, वृद्धत्व, मधुमेह आणि लठ्ठपणा यांच्यातील गुंतागुंतीच्या संबंधांवर केंद्रीत आहे.
तिच्या पीएचडी अभ्यासक्रमादरम्यान, सुरभिने अपवादात्मक शैक्षणिक कामगिरी आणि संशोधनातील योगदानामुळे स्वतःची ओळख निर्माण केली. तिने १४ राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये आपले संशोधन सादर केले. तिने अनेक पुरस्कार मिळवले आहेत.www.konkantoday.com