
दीड लाखाची लाच स्वीकारतानाविशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता ताब्यात.
दीड लाखाची लाच स्वीकारतानाविशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ताला लाचलुचपत विभागाने ताब्यात घेण्यात आले आहे रत्नागिरी जिल्ह्यात ही घटना घडल्याने एकच एकच खळबळ उडाली आहे.श्री. राजेश देवराव जाधव, विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता, प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी वर्ग १, खेड, ता. खेड, जि.रत्नागिरी यांना तक्रारदार यांचेकडुन लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग रत्नागिरी यांनी ताब्यात घेतले.काल संध्याकाळी चिपळूण येथील ओयासीस हॉटेल, चिपळूण येथे दिनांक ०९/०१/२०२५ रोजी १९.१७ वाजता रंगेहाथ पकडण्यात आलेले असून चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
श्री. राजेश देवराव जाधव, विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता, प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी वर्ग १, खेड, ता.खेड, जि. रत्नागिरी यांनी ५,००,०००/- रुपयेमागणी केलेली लाच रक्कम होती. आणि स्विकारलेली लाच रक्कम १,५०,०००/- रुपयेयातील तक्रारदार यांनी घरडा कंपनीच्या केसमध्ये प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी, वर्ग १, खेड यांचे न्यायालयात वकील पत्र घेतलेले आहे. सरकार पक्षाच्यावतीने सदरची केस श्री. राजेश देवराव जाधव, विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता हे पाहत होते. तुमची केस कशी सुटेल असे प्रयत्न करेन, जास्त सरतपास न घेता महत्वाचे मुददे वगळून आरोपी निर्दोष कसे सुटतील व केस लवकर संपवायला मदत करण्यासाठी ५,००,०००/- रुपयांची मागणी करुन त्यापैकी पहिला हप्ता म्हणुन १,५०,०००/- रू. स्विकारण्याचे मान्य केल्याचे निष्पन्न झालेले होते. तक्रारदार यांचेकडुन १,५०,०००/- रुपये लाचेची रक्कम स्वीकारताना ओयासीस हॉटेल, चिपळूण येथे ताब्यात घेण्यात आले