एवढा स्वाभिमान असेल, तर उद्धव ठाकरे यांनी विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा-मनसे नेते संदीप देशपांडे
_उद्धव ठाकरे हे सोडून गेलेल्या आमदारांच्या जीवावर विधान परिषदेचे आमदार झाले. एवढा स्वाभिमान असेल, तर उद्धव ठाकरे यांनी विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा आणि परत निवडणूक लढवून दाखवावी. संजय राऊतही याच सोडून गेलेल्या खासदारांच्या जीवावर राज्यसभेवर गेले.त्यांनीही राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा आणि लोकसभा लढवावी. संजय राऊतांमध्ये तेवढी हिंमत आहे का, असे थेट आव्हान मनसे नेते संदीप देशपांडे यांनी दिले आहे. मीडियाशी बोलताना संदीप देशपांडे म्हणाले की, राज ठाकरे यांनी घेतलेली भूमिका महाराष्ट्राच्या आणि देशाच्या हिताची आहे. ज्या लोकांना फक्त स्वतःचा स्वार्थ कळतो. त्यांना या गोष्टी कळणार नाही. ज्यांनी स्वतःच्या भावाचे नगरसेवक फोडले, त्यांना त्यागाच्या गोष्टी काय कळणार, असा सवाल करत आता ते ज्या आघाडीत गेले आहेत, तिथेही काँग्रेसची जागा ओरबाडून खाल्ली. ज्यांचे आयुष्य दुसऱ्याचे ओरबाडण्यात गेले, त्यांनी आम्हाला काय शिकवावे, असा सवाल संदीप देशपांडे यांनी ठाकरे गटाला उद्देशून केला.www.konkantoday.com