कोकणातील सुंदर समुद्रकिनारे पर्यटकांना आकर्षित करीत असताना देखील सुविधामुळे पर्यटकांच्यात नाराजी
रत्नागिरीहून जाताना पर्यटकांना सागरी मार्गाची भुरळ पडते. याच मार्गावरील गावखडी समुद्रकिनाऱ्यावर पर्यटक थांबून आनंद घेतात; परंतु किनाऱ्यावर पर्यटनदृष्ट्या सोयीसुविधांचा अभाव असल्यामुळे पर्यटक ठराविक वेळ थांबून मार्गस्थ होतात. पर्यटकांनी जास्तीत जास्त वेळ या किनाऱ्यावर थांबावेत यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी पर्यटकांकडून होत आहे.रत्नागिरी जिल्हा फिरण्यासाठी येणारे पर्यटक गणपतीपुळे, पावस असा प्रवास करून आडिवऱ्याच्या महालक्ष्मीच्या दर्शनाला पुढे जातात. पावसहून पुढे जाताना लागणारा गावखडी किनारा पर्यटकांना भुरळ घालतो. दाट सुरूचे बन, शांत समुद्र यामुळे पर्यटक तिथे थांबतात. काहीजण समुद्रस्नानाचा आनंदही घेतात. मागील काही कालावधीत येथे पर्यटक बुडण्याचे प्रकार घडले होते. त्यामुळे पर्यटकांच्या सुरक्षेसाठी किनाऱ्यावर एक टेहळणी टॉवर उभारण्यात आला; परंतु त्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे टॉवरचीच दुरवस्था झाली आहे.www.konkantoday.com