आशानी निवडणुकीसंदर्भातील कोणतेही काम करू नये,-संघटनेच्या जनरल सेक्रेटरी सुमन पुजारी यांचे आवाहन
_महिला गटप्रवर्तकांच्या तोंडाला सरकारकडून पाने पुसण्याचे काम करण्यात आल्याचा आरोप आशा गटप्रवर्तक आरोग्य कर्मचारी संघटनेकडून यापूर्वीच करण्यात आला आहे. आशांनी निवडणुकीसंदर्भातील कोणतेही काम करू नये, असे आवाहन सर्व आशा व गटप्रवर्तक महिलांना संघटनेच्या जनरल सेक्रेटरी सुमन पुजारी यांनी केले आहे.२३ ऑगस्ट २०१९ मध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे अभियान संचालक अनुपकुमार यादव यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकार्यांना असे पत्रक काढले आहे. त्या पत्रानुसार आशा महिलांना अगोदरच जास्त काम करावे लागते त्यामुळे त्यांना निवडणुकीसंदर्भातील आणि बीएलओचे कसलेही काम देवू नये, ते पत्र सर्व आशांना पाठविण्यात आले आहे. कोणीही आशानी निवडणुकीसंदर्भातील कोणतेही काम करू नये, निवडणुकीसंदर्भात नेमणूक होत असल्यास आशांनी अधिकार्यांना त्या पत्राची झेरॉक्स प्रत दाखवावी, असे पुजारी यांनी सांगितले. राष्ट्रीय आरोग्य अभियानात (एनएचएम) काम करणार्या महिला गटप्रवर्तकांच्या मासिक मानधनात केवळ एक हजार रुपयांची वाढ केली आहे. राज्य सरकारने त्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम केल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य आशा गटप्रवर्तक आरोग्य कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष शंकर पुजारी यांनी केले. www.konkantoday.com