दि रामसे ब्रदर्सचे दिग्गज सिनेमॅटोग्राफर, चित्रपट निर्माते गंगू रामसे यांचे निधन

दि रामसे ब्रदर्सचे दिग्गज सिनेमॅटोग्राफर, चित्रपट निर्माते गंगू रामसे यांचे वयाच्या ८३ व्या वर्षी निधन झाले. मागील काही दिवसांपासून ते आजारी होते.मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनामुळे सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे. गंगू रामसे हे रामसे ब्रदर्सपैकी एक होते. त्यांचे ८० आणि ९० च्या दशकात हॉरर चित्रपट गाजले होते. ते प्रसिद्ध चित्रपट निर्माता आणि सिनेमॅटोग्राफर होते. त्यांचे वडील एफ. यु. रामसे प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर आणि चित्रपट निर्माता होते. त्यांनी हॉरर चित्रपटांच्या माध्यमातून इंडस्ट्रीत एक वेगळी ओळख निर्माण केली होती. चित्रपट निर्मितीत त्यांचे मोठे योगदान होतेwww.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button