
वाढता उष्मा लक्षात घेता उपजिल्हा, ग्रामीण रूग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रात उष्माघात कक्ष सुरू
उष्माघाताचा त्रास टाळण्यासाठी नागरिकांनी आरोग्याची योग्य ती काळजी घ्यावी असे आवाहन जिल्हा परिषदेमार्फत करण्यात आले आहे. उपजिल्हा रूग्णालय, ग्रामीण रूग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रात उष्माघात कक्ष सुरू करण्यात आला आहे.जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकिरण पुजार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील सर्व तालुका अधिकार्यांची ऑनलाईन बैठक संपन्न झाली. या बैठकीत सदरचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरूद्ध आठल्ये, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर जगताप, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एम. डी. गावडे, जिल्हा मालमत्ता बालसंगोपन अधिकारी डॉ. पल्लवी पगडाल, निवसी वैद्यकीय अधिकारी डॉ. अंकुश शिरसाट आादी मान्यवर यावेळी उपस्थित होते. सर्वसामान्य नागरिकांचा उष्माघातापासून बचाव करणे, आरोग्याची काळजी घेणे याबाबत आरोग्य अधिकार्यांनी व्यापक जनजागृती करावी, अशी सूचना किर्तीकिरण पुजार यांनी केली आहे.प्राथमिक आरोग्य केंद्रातील उष्माघात कक्षात रूग्णांसाठी बेड, थंड पाण्याची सुविधा, फॅन, अत्याआवश्यक औषधे आदी साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. उष्म्याचे प्रमाण अचानकपणे वाढले आहे. उन्हात फिरणार्या व्यक्तींना उष्माघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कामाशिवाय तीव्र उन्हात नागरिकांनी फिरू नये, नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी. जिल्ह्यातील सर्व उष्माघात कक्षामध्ये आवश्यक असलेली साधनसामुग्री उपलब्ध करून देण्यात आली आहे. www.konkantoday.com