
गृहपाठ पूर्ण न केल्याने विद्यार्थ्याला मारहाण, पालकांची मुख्याध्यापकांकडे तक्रार
संगमेश्वर तालुक्यातील एका शाळेत गृहपाठ केला नाही म्हणून शिक्षिकेने विद्यार्थ्याला मारल्याने दुखापत झाल्याची तक्रार मुलाच्या पालकांनी मुख्याध्यापकांकडे केली आहे. या मारहाणीत त्या विद्यार्थ्याच्या कानाला आणि डोळ्याला दुखापत झाल्याचा आरोप मारहाण झालेल्या विद्यार्थ्याच्या पालकांनी गटशिक्षणाधिकारी प्रदीप पाटील यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. निवेदनात नमूद केल्यानुसार सदर विद्यार्थी तिसरीत शिकत असून तो ४ एप्रिलला शाळेत गेला होता. त्यावेळी शिक्षिकेने त्याला गृहपााठ पूर्ण केला नाही म्हणून हाताने मारहाण केली. यात त्याच्या कानाला व डोळ्याला दुखापत झाली आहे. त्याच्यावर जवळच्या आरोग्य केंद्रात उपचार करावे लागले.आपल्याला न्याय मिळत नाही तो पर्यंत आपल्या मुलांना शाळेत पाठविणार नाही. यामुळे होणार्या शैक्षणिक नुकसानीला सदर शिक्षिका जबाबदार राहतील, असेही निवेदनात म्हटले आहे. या संदभांत गटशिक्षणाधिकाारी प्रदीप पाटील यांच्याशी संपर्क साधला असता विद्यार्थी मारहाणप्रकरणी स्वतः शाळेत येवून चौकशी करणार असल्याचे सांगितले.www.konkantoday.com