कोळकेवाडी चौथ्या टप्प्यावर गेटबाहेर अस्वलाचे दर्शन, वनविभागाकडून नकार.

कोळकेवाडी धरण प्रकल्पाच्या चौथ्या टप्प्याजवळील गेटबाहेर अस्वल फिरत असल्याचा थरारक व्हिडिओ बुधवारी सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला. विशेष म्हणजे हा व्हिडिओ परिसरातील एका कर्मचार्‍यानेच मोबाईलमध्ये चित्रित केल्याचे सांगितले जात आहे. यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.कोळकेवाडीचा चौथा टप्पा म्हणजेच सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये वसलेला, घनदाट जंगलाने वेढलेला भाग आहे. वन्यजीवांच्या अधिवासाचे हे ठिकाण असून वेळोवेळी प्राण्यांचे दर्शन होत असते. मात्र, गेटच्या इतक्या जवळ व लोकवस्तीजवळ अस्वल असल्याचे हे पहिलेच प्रकरण आहे. या संदर्भात वनविभागाशी संपर्क साधला असता त्यांच्याकडे यासंदर्भात कोणतीही अधिकृत माहिती नसल्याचे स्पष्ट करण्यात आले.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button