
शिवाजी स्टेडियम येथे नऊ वर्षीय चिमुरडीवर अत्याचार
रत्नागिरी शहरातील शिवाजी स्टेडियममध्ये नऊ वर्षीय चिमुरडीवर अत्याचार केल्याची निंदा दायक घटना उघड झाली आहे .या प्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपी म्हणून विकास पवार राहणार मेरवी याला अटक केली आहे .सदरच्या मुलीला दोनछोट्या भावांसह तिचे आई वडील शिवाजी स्टेडियमवर सोडून गेले होते. यातील आरोपी विकास पवार हा मद्यप्राशन करण्यासाठी स्टेडियमवर आला होता त्यावेळी त्याला ही चिमुरडी दिसली त्यावरी तेने लिलावतीच्या भावांना वडापाव खाण्याचे आमिष दाखवले व सदर मुलीवर अत्याचार केला .सदरच्या आरोपी संशयास स्थितीत फिरताना पाहिल्यावर लोकांनी त्याला रोखून धरले यानंतर हा प्रकार पोलिसांना कळवल्यावर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले व त्याच्यावर अतिप्रसंग केल्याचा गुन्हा दाखल केला. शिवाजी स्टेडियम सारख्या भरवस्तीत हा प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे. तसेच या छोट्या मुलांना त्यांचे आई वडील एकटेच का सोडून गेले हा प्रश्न निर्माण झाला आहे .या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.