
महाराष्ट्रात करोनाची दुसरी लाट आली असतानाही केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला ठोस मदत नाही -डॉ शशांक जोशी
महाराष्ट्रात करोनाची दुसरी लाट आली असतानाही केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला ठोस मदत दिली जात नाही. केंद्रीय पथके राज्यात पाहणीसाठी येतात आणि ‘मास्तरां’प्रमाणे केवळ उपदेशाचे डोस पाजून निघून जातात. महाराष्ट्रात आज मोठ्या प्रमाणात लसीकरणाची गरज असताना पुरेशा प्रमाणात लसही पाठवली जात नाही आणि केंद्राच्या निर्बंधांमुळे सर्वांना लस देताही येत नाही, असे राज्य कृती दलाचे सदस्य, ‘कॉलेज ऑफ फिजिशियन’ चे डिन व ज्येष्ठ मधुमेहतज्ज्ञ डॉ शशांक जोशी यांनी सांगितले. महाराष्ट्रात सरकारने कठोर पावले न उचलल्यास दुसरी लाट वाढेल असा इशारा डॉ. जोशी यांनी दिला.
www.konkantoday.com