
82 या वर्षी आजीने साकारली शबरीची भूमिका, सर्वत्र कौतुक
_संगलट (खेड) ( मुजीब नाडकर ) माणसाचे वय वाढतच जाते वृध्दत्व आलेकी बरेच जण थकतात माझ्याने आता काही होत नाही असे टुमणे लावतात परंतु खेड मध्ये नुकताच शिमगोत्सव पार पडला त्यात “शबरीची उष्टी बोरं” हा कासार आळीतील चित्ररथ आकर्षण ठरला तो केवळ शबरी च्या भूमिकेतील श्रीमती उज्वला गजानन दांडेकर वय वर्षे ८२ यांच्या मुळे. खरेतर चतुर्थीला निघणाऱ्या खेड मधील चित्ररथात भले भले तरुण नकार देतात कारण पहाटे ५ वाजेपर्यंत ठराविक स्थितीत बसावे किंवा उभे रहावे लागते. कासार आळीतील तरुणांनी उज्वला आजींना विचारले की आजी तुम्हाला शबरीच्या भुमिकेसाठी आम्ही ठरवले आहे बसाल ना चित्ररथात? तेंव्हा आजींना मस्करी वाटली व आजी थोड्या लाजल्यही पण आजी तयार झाल्या. याच आजी नवरात्रोत्सवात ही तरुण महिलांसोबत देवी च्या गाण्यावर बसवलेल्या नृत्यात तेवढ्याच उत्साहाने नाचत होत्या. पहाटे ५ वाजता चित्ररथ मिरवणूक संपली आजींना विचारले काही त्रास होतोय का? तर आजी म्हणाल्या ” छे, त्रास कसला नुसते बसायचे तर होते ” आजी सजवलेल्या ट्रॅक्टर ट्रॉली वर ज्या उत्साहाने चढल्या होत्या तोच उत्साह शेवटी होता. कासार आळी मित्रमंडळ आजींचे खरेच आभारी आहेत. या ८२ वर्षाच्या आजींनी दाखवून दिले की वय वाढलेय म्हणून मी जेष्ठ झालीय पण म्हातारी नाही आजींच्या या उत्साहाचे सर्वत्र कौतुक होत आहेwww.konkantoday.com