सुसेरी येथील वृद्धाचा उपचाराच्या दरम्याने आकस्मिक मृत्यू
खेड तालुक्यातील सुसेरी नं. १ येथील ५४ वर्षीय वृद्धाचा डेरवण येथील वालावलकर रूग्णालयात मृत्यू झाला. संजय यशवंत कदम (मुळ गाव सुसेरी नं. १ सध्या रा. घाटकोपर मुंबई) असे मृत वृद्धाचे नाव आहे. उलट्या होवून आकडी आल्याने कळंबणी उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. नंतर डेरवण येथील वालावलकर रूग्णालयात दाखल करण्यात आले असता वैद्यकीय अधिकार्यांनी मृत घोषित केले.www.konkantoday.com