शौकत मुकादम यांनी आवाज उठविल्याने मुंबई-गोवा महामार्गावर पेव्हर ब्लॉक बसविण्यास स्थगिती
चिपळूण शहरातील मुंबई-गोवा महामार्गावर रावतळे येथे सध्या पेव्हर ब्लॉक बसवण्याचे काम वेगात सुरू करण्यात आले होते. सर्व्हिस रोडला जोडून रस्त्याच्या रूंदीकरणासाठी हे काम केले जात असून हे पावसाळ्यात मृत्यूला आमंत्रण आहे. या विरोधात माजी सभापती शौकतभाई मुकादम यांनी नुकताच आवाज उठविला होता. त्याची गंभीर दखल राष्ट्रीय महामार्ग खात्याच्या अधिकार्यांनी यापुढे पेव्हर ब्लॉक बसवण्यात येणार नाही, असे आश्वासन शौकत मुकादम यांना दिल्याने त्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे.पेव्हर ब्लॉकबाबत मुकादम यांनी आवाज उठविला होता. पावसाळ्यात पेव्हर ब्लॉक बसविलेल्या रस्त्यावर पेव्हर ब्लॉक बसविलेल्या रस्त्यावर चिखल होवून दुचाकीचे अपघात होतील. याची जबाबदारी कोण घेणार, महिलांनी काय करायचे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. याची दखलल घेवून मुंबई-गोवा हायवेच्या अधिकार्यांनी यापुढे मुंबई-गोवा हायवेवर पेव्हर ब्लॉक बसविता येणार नाही, असे मुकादम यांना कळविल्याचे समजते. सध्या पेव्हर ब्लॉक बसण्यिाचे सुरू असलेले काम फक्त २०० मीटरपर्यंत करण्यात येईल व त्यापुढे पेव्हर ब्लॉक बसविण्यात येणार नाही. www.konkantoday.com