
तालुक्याच्या सर्वांगीण विकासावर भर देत पक्ष संघटन वाढीसाठी मेहनत घेणार. — नवनियुक्त भाजप तालुका अध्यक्ष दादा दळी यांचे प्रतिपादन.
पक्ष नेतृत्वाने रत्नागिरी तालुका दक्षिण चे अध्यक्ष पद ही फार महत्वाची जबाबदारी माझ्यावर दिली आहे ती कार्यकर्त्याच्या पाठबळावर व भाजपच्या पदाधिकारी वा नेतृत्वाच्या मार्गदर्शनाने यशस्वी पणे पार पाडेन. तालुक्यातील जनतेच्या मूलभूत गरजा ,पक्षाचे सर्व कार्यक्रम, केंद्र व राज्य सरकारच्या योजना प्रभावी पणे राबवून भाजपचे पक्ष संघटन वाढवण्यासाठी खूप मेहनत घेणार असे नवनियुक्त भाजपचे तालुका अध्यक्ष रत्नागिरी दक्षिण श्री दादा दळी यांनी केले.
मी माझ्या वडिलांपासून अनेक वर्षे भाजपचे काम करत आहे. स्थानीय समिती चा सरचिटणीस या पदावरून शक्तिकेंद्र प्रमुख मग 2013 ते 2016 तालुक्याचा चिटणीस, 2016 ते 2019 तालुक्याच्या सरचिटणीस अशी पदे भूषवली. या सर्व प्रवासात मला नेहमीच नामदार रवींद्रजी चव्हाण साहेब, कोकण चे नेते नामदार नारायणराव राणे साहेब,भाजप नेते मा. बाळासाहेब माने,माजी खासदार निलेश राणे साहेब, माजी आमदार प्रमोदजी जठार, मा. अशोक राव मयेकर, सतीशजी शेवडे, जिल्हा अध्यक्ष राजेश जी सावंत, संघटन मंत्री मा. शैलेंद्र दळवी, निरीक्षक महेश जाधव साहेब, प्रदेश भाजप चे अतुल काळसेकर साहेब , मा. नाना शिंदे,दत्ताजी देसाई, advocate भाऊ शेट्ये आदी पदाधिकारी यांचे मार्गदर्शन व आशीर्वाद मिळाले. या सर्वांचे मनपूर्वक आभार.
भाजप चे प्रदेश अध्यक्ष मा. आ. चंद्रशेखर बावनकुळे व भाजप नेते राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अपेक्षित असे पक्ष कार्य सर्वांना बरोबर घेऊन उभे करू असे यावेळी दादा दळी यांनी सांगितले.
www.konkantoday.com