
निवडणूक अवघड, धनशक्तीचाही जोर होता, आमदार शेखर निकम यांचे मनोगत.
ही निवडणूक सोपी नव्हती. अनेक अडचणींना मला सामोरे जावे लागले. माझ्या विरोधात मोठ्या प्रमाणात अपप्रचार करण्यात आला. त्या शिवाय धनशक्तीचाही मोठा जोर होता परंतु तुम्ही सर्वांनी ज्या ताकदीने मला सपोर्ट केला, माझ्यासाठी धावून आलात त्यामुळेच विजयी आमदार होण्याचे भाग्य मला लाभले, अशी प्रांजळ कबुली देताना चिपळूण-संगमेश्वरचे आमदार शेखर निकम यांनी आभार मानले.
तेव्हा उपस्थित शेकडो चाकरमान्यांनी आमदार शेखर निकम यांचा विजय असो, अशी घोषणा देत सभागृह दणाणून सोडले.www.konkantoday.com