
काजू पिकाला हवामानाची मोठी झळ बसली, उत्पादनात मोठी घट
जिल्ह्याला हमखास उत्पन्न देणाऱ्या काजू पिकाला हवामानाची मोठी झळ बसली असून, उत्पादनात मोठी घट झाली आहे. काजूवर फुलकिडे, टीम माॅस्क्युटो रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे.त्यामुळे यावर्षी ४० ते ५० टक्के इतकेच उत्पादन आहे. यावर्षी गावठी काजूसाठी १०५ तर वेंगुर्ला ४ व ५ साठी ११५ रुपये दर दिला जात आहे. उत्पादन कमी असल्याने दर वाढवून मिळावा किंवा हमीभाव जाहीर करावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.ओल्या काजूगर विक्रीबरोबर वाळविलेल्या काजू बीची विक्री करून शेतकऱ्यांना उत्पन्न मिळते. गावठी काजूबरोबर कोकण कृषी विद्यापीठ प्रमाणित वेंगुर्ला ४ व ५ या वाणाची लागवड शेतकऱ्यांनी केली आहे. मात्र, सुरुवातीपासून फुलकिडे (थ्रीप्स), टीम माॅस्क्युटो रोगाचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे काजू पिकावर कीडरोग प्रतिबंधात्मक फवारणी करावी लागली. काही ठिकाणी फवारणी करूनही शेतकरी फुलकिड्यावर नियंत्रण मिळवू शकले नसल्यामुळे काजू बीच्या टरफलावर काळे डाग पडून बिया काळवंडल्या आहेत.हवामानातील बदलामुळे यावर्षी काजूचे उत्पादन घटले असून, उत्पादन व खर्च यांचा मेळ बसत नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहेwww.konkantoday.com