शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब व सदानंद कदम यांच्या दापोली येथील रिसॉर्टवर कारवाई सुरु
शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांच्या दापोली येथील रिसॉर्टवर कारवाई सुरु करण्यात आली आहे. बेकायदा बांधकाम केल्या प्रकरणात ही कारवाई करण्यात येत आहे. रिसॉर्ट पाडले जात आहे. या प्रकरणी अनिल परब आणि सदानंद कदम यांचा विरोधात दापोली पोलिस स्टेशन 14 नोव्हेंबर 2022 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.दापोलीमधील मुरूड समुद्रकिनाऱ्यावर अनिल परब यांचे साई रिसॉर्ट हॉटेल आहे. या ठिकाणी सीआरझेड कायद्याचे उल्लंघन झाल्याचा आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. हे रिसॉर्ट बांधताना २०० मीटरच्या आत बांधकाम करून सीआरझेड कायद्याचे उल्लंघन केले. समुद्र गिळंकृत केला, असा आरोप सोमय्या यांनी केला.
अनिल परब यांच्या दापोली येथील रिसॉर्टचा प्रश्न भाजप नेते किरीट सोमय्या यांनी लावून धरला होता. या ठिकाणी बेकायदेशी बांधकाम करुन गुन्हेगारी कृत्य केल्याचा आरोप सोमय्या यांनी केला होता. त्यासंदर्भात तक्रारही केली होती. अखेर या रिसॉर्टचे बांधकाम तोडण्यास सुरुवात झाली आहे. यासंदर्भातील टि्वट सोमय्या यांनी केले आहे.
www.konkantoday.com