विद्यार्थ्यांच्या आधार वैधतेत अव्वल कामगिरीत रत्नागिरी जिल्ह्याचा समावेश
राज्यातील २ कोटी १२ लाख ५५ हजार ३५ शालेय विद्यार्थ्यांना विविध योजनांचा लाभ देण्यासाठी आवश्यक असलेल्या आधार व्हॅलिडेशनसाठी दि. ३० मार्च ही अंतिम मुदत देण्यात आली होती. प्रत्यक्षात १ कोटी ९४ लाख ६९ हजार २१५ विद्यार्थ्यांचेच आधार वैध ठरले आहे. त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील ७४५७ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. मात्र असे असले तरी विद्यार्थी आधार क्रमांकाचे ९५ टक्केपेक्षा अधिक काम मुदतीत पूर्ण करणार्या जिल्ह्यांना महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेने अभिनंदन पत्र पाठविले आहे. त्या पहिल्या बारा जिल्ह्यांमध्ये रत्नागिरीचा समावेश आहे. जि.प. मुख्य कार्यकारी अधिकार्यांसह शिक्षणाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षकांचे राज्य प्रकल्प संचालक प्रदीपकुमार डांगे यांनी कौतुक केले आहे.www.konkantoday.com