भाजपने एकनाथ शिंदेसाहेबांचा बळी घेऊ नये-आमदार बच्चू कडू
देशात सार्वत्रिक लोकसभा निवडणूक होतेय. भाजपला हरवण्यासाठी देशभरातील नेत्यांनी आघाडी केली आहे. महायुती विरूद्ध महाविकास आघाडी अशी राज्यात थेट लढत होत आहे. अशात महायुतीतील नेत्यानं खळबळजनक विधान केलं आहे.त्यांच्या या विधानाने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. भाजपने एकनाथ शिंदेसाहेबांचा बळी घेऊ नये. त्यांना कशा पद्धतीने मदत केली पाहिजे ते पाहल्या गेलं पाहिजे, असं प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होत आहे.
भाजपने शिंदे साहेबांचा बळी घेऊ नये. त्यांना कशा पद्धतीने मदत केली पाहिजे, ते पाहल्या गेलं पाहिजे. भावना गवळी त्या ठिकाणी पाच वर्षांपासून खासदार आहे. त्यामुळे त्या ठिकाणी कोणाला तिकीट द्यावं तो त्यांचा प्रश्न आहे. मी फक्त अमरावती पुरताच बोलेल. एक खासदार शेतकऱ्यांसाठी, मजुरांच्या प्रश्नासाठी, संत्र्याच्या प्रश्नासाठी ही उमेदवारी आहे. शेतकरी, मजूर , व्यापारी यांचं दुकान बंद करण्याची व्यवस्था येत्या पाच वर्षात सरकारने केली आहे. किराणा, कापड उद्योग बंद झालेले दिसेल. ती अवस्था आमच्यावर येऊ नये. म्हणून दिनेश बुब यांना तिथे पाठवायचं आहे, असं बच्चू कडू म्हणाले.
www.konkantoday.com