
दादर-रत्नागिरी पॅसेंजर लवकरच धावणार,रेल्वे व्यवस्थापनाचे आमदार शेखर निकम यांना लेखी पत्र
कोरोना पार्श्वभूमीवर गेली कित्येक महिने बंद असलेली आणि कोकणातील गोरगरीब व सर्वसामान्य प्रवाशांना आधार ठरलेली दादर-रत्नागिरी पॅसेंजर रेल्वे लवकरच सुरू होणार आहे. यासंदर्भात कोकण रेल्वेचे व्यवस्थापक संजय गुप्ता यांनी आमदार शेखर निकम यांना लेखी पत्र दिले आहे. याबरोबरच कडवई येथे स्थानक बांधकामासाठीही निधीची तरतूद करण्यात येणार असून गणेशोत्सवासाठी कोकणात तब्बल दीडशे गाड्या सोडल्या जाणार असल्याचे कळवले आहे.
www.konkantoday.com