
विधानसभा अध्यक्षांचा अपमान ,त्या १२ आमदारांचा खेड युवा सेनेच्या वतीने निषेध
खेड – विधानसभा अध्यक्षांना अपमान करणाऱ्या भाजपाच्या १३ निलंबीत आमदारांचा खेड युवा सेनेच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला. युवा सेना जिल्हाधिकारी अजिक्य मोरे यांच्या नेतृत्वाखाली शहरातील तीनबत्ती नाका येथे हे आंदोलन छेडण्यात आले.
दोन दिवशीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सभागृह अध्यक्ष भास्कर जाधव यांना भाजपाच्या १२ आमदारांनी अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करुन त्यांचा अपमान केला होता. या घटनेचे पडसाद तात्काळ अवघ्या महाराष्ट्राभर उमटायला सुरवात झाली. खेड येथे युवा सेनेचे जिल्हाधिकारी अजिंक्य मोरे यांच्या नेतृत्वाखाली युवा सेनेचे पदाधिकारी आणि युवासैनिक एकत्र आले आणि त्यांनी सभागृहात गैरवर्तन करणाऱ्या भाजपाच्या त्या १२ आमदारांचा निषेध करत आंदोलन छेडले. यावेळी या आमदारांच्या विरोधात युवा सेनेने जोरदार घोषणाबाजी केली.
यावेळी तालुका सचिव राकेश सागवेकर, शहर अधिकारी सिद्धेश खेडेकर,युवतीसेना तालुका अधिकारी सिद्धी शिंदे, वाहिम ममतुले, सुप्रिया कदम, प्रसाद पाटणे,” दर्शन महाजन, आदित्य चिखले, प्रणय ननावरे, साईराज खेडेकर, कबीर मोकाशी, रोहीत यादव, कौशल जाडकर, रोहन पाडाळकर, प्रसन्न
कालेकर, विनोद खांबे, हर्षदा भुवड आदी उपस्थित होते.
www.konkantoday.com
