ज्येष्ठ नागरिकांची सवलत रद्द करून रेल्वेने कमावला तब्बल 5,800 कोटी रुपयांपेक्षा जास्त महसूल
_भारतीय रेल्वे म्हणजे प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय. रेल्वेचे मोठे जाळे भारतभर पसरलेले आहे. साहजिकच त्यातून रेल्वे विभागाला मोठा महसूल मिळतो. नुकत्याच मिळालेल्या एका माहितीनुसार रेल्वेला तब्बल 5,800 कोटी रुपयांपेक्षा जास्त महसूल मिळाला आहे.खरेतर एखाद्या विशेष सेवेमधून नाही तर एक सवलत मागे घेतल्यामुळे हा मोठा महसूल रेल्वेला मिळाला आहे. चला जाणून घेऊया ही सेवा नेमकी कोणती आहे.खरेतर माहितीचा अधिकार (RTI) कायद्यांतर्गत विचारण्यात आलेल्या प्रश्नांवरून ही माहिती समोर आली आहे. ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे भाड्यात देण्यात आलेल्या सवलती मागे घेतल्यापासून भारतीय रेल्वेने ज्येष्ठ नागरिकांकडून 5,800 कोटी रुपयांपेक्षा जास्त महसूल मिळवला आहे.20 मार्च 2020 रोजी, कोविड मुळे देशव्यापी लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर, रेल्वे (Indian Railway) मंत्रालयाने ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे भाड्यात दिलेली सवलत मागे घेतली होती. तोपर्यंत रेल्वे महिला प्रवाशांना रेल्वे भाड्यात 50 टक्के आणि पुरुष आणि ट्रान्सजेंडर ज्येष्ठ नागरिकांना 40 टक्के सवलत देत असे. ही सूट काढून टाकल्यानंतर ज्येष्ठ नागरिकांना इतर प्रवाशांप्रमाणेच भाडे मोजावे लागले. www.konkantoday.com