
मेडिकल कॉलेजपेक्षा प्रथम आरोग्य यंत्रणा सुधारा -डॉ. विनय नातू
रत्नागिरीतील डॉक्टरेट मंत्री रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सरकारचा हलगर्जीपणा लपविण्यासाठी आणि प्रसिद्धीसाठी वेगवेगळ्या घोषणा करत आहे. या प्रसिद्धीच्या घोषणा करण्यापेक्षा कोरोना समुळ नष्ट करण्यासाठी दोन्ही जिल्ह्यात ठोस उपाययोजना कराव्यात अशी टीका भाजपा उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. विनय नातू यांनी केली.
रत्नागिरी जिल्ह्यात खास बाब म्हणून तर सिंधुुदुर्ग जिल्ह्यात बृहत आराखड्यानुसार लवकरच मेडिकल कॉलेज होणार असल्याची घोषणा मंत्री उदय सामंत यांनी नुकतीच केली होती. यासंदर्भात डॉ. नातू यांनी ही टीका केली आहे. रत्नागिरीत अनेकांच्या रेट्यानंतर सुरू झालेल्या कोविड १९ च्या टेस्ट लॅबमध्ये वैद्यकीय अधिकार्यांमध्ये धुसपूस सुरू आहे. जिल्ह्यातील प्रमुख अधिकारी कोरोना बाधीत आहेत. निसर्ग चक्रीवादळग्रस्त भागात आरोग्य सेवेकडे पूर्ण दुर्लक्ष आहे. याकडे कोण लक्ष देणार? असा सवाल त्यांनी केला आहे.
प्रथम रत्नागिरी जिल्ह्यामधृये प्रथम ५०० खाटांचे सुसज्ज हॉस्पिटल सुरू करा मग महाविद्यालयाची चर्चा करू, असा टोला ना. सामंतांना लगावला.
konkantoday.com