
“आम्ही माफी मागतो”, दिशाभूल करणाऱ्या जाहिरातीवरून रामदेव बाबांची सपशेल माघार
_दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींच्या प्रकरणात पतंजली आयुर्वेद या कंपनीला सुप्रीम कोर्टाने फटकारलं होतं. योगगुरु रामदेव बाबा आणि कंपनीचे एमडी आचार्य बाळकृष्ण यांना कोर्टात हजर राहण्यासाठी कोर्टाने समन्स बजावलं होतं. मंगळवारी रामदेवबाबा आणि बाळकृष्ण हे दोघेही कोर्टात पोहोचले होते. सुनावणी सुरु झाली त्यावेळी रामदेव बाबांच्या वकिलांनी म्हटलं की, आम्ही अशा जाहिरातींसाठी माफी मागतो. आपल्या आदेशानुसार स्वतः योगगुरु रामदेव बाबा कोर्टात पोहोचलेपतंजली आयुर्वेदच्या वकिलांनी पुढे म्हटलं की, स्वतः रामदेव बाबा कोर्टात हजर असून ते माफी मागत आहेत. कोर्टाने त्यांच्या माफीची नोंद घ्यावी. आम्ही कोर्टापासून पळ काढण्याचा प्रयत्न करत नाहीत.वकिलांनी पुढे म्हटलं, या प्रकरणासंदर्भात मी काही मजकूर वाचू शकतो का? दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींबद्दल सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशाची आमच्या मीडिया प्रमुखांना माहिती नव्हती. त्यामुळे अशी जाहिरात चालली. यावर न्यायमूर्ती अमानुल्लाह आणि न्यायमूर्ती हिमा कोहली यांच्या कोर्टाने म्हटलं की, तुम्हाला याची माहिती नव्हती, असं समजणं अवघड आहे.सुप्रीम कोर्टाने २०२३ मध्ये पतंजली या कंपनीला आदेश दिला होता की, त्यांनी दिशाभूल करणाऱ्या जाहिराती माघारी घ्याव्यात. जर त्यांनी असं केलं नाही तर आम्हाला कारवाई करावी लागेल. नाहीतर पतंजलीच्या प्रत्येक चुकीच्या जाहिरातींवर एक कोटी रुपयांचा दंड आकारण्यात येईल.दरम्यान न्यायमूर्ती अमानुल्ला यांनी रामदेव बाबांनी योगाच्या क्षेत्रात मोठं काम उभं केलं आहे. परंतु त्यांनी ॲलोपथी औषधांवरुन असे दावे करणं चुकीचं असल्याचे म्हटले.त्यातच आयएमएच्या वकिलांनी म्हटलं की, त्यांनी त्यांची जाहिरात करावी परंतु ॲलोपथी चिकित्सा पद्धतीवर विनाकारण टीका झाली नाही पाहिजे.www.konkantoday.com