पाणीटंचाई म्हणून नागरिकांना पाणी नाही पण रत्नागिरी नगर परिषदेचे पाणी वाहतय रस्त्यावर
रत्नागिरी नगर परिषदेला पाणी पुरवणाऱ्या धरणातील पाणीसाठा उष्म्यामुळे कमी झाल्याचे कारण सांगून रत्नागिरी नगर परिषदेने रत्नागिरी शहरवासीयांना पाण्याची कपात केली आहे रत्नागिरी नगर परिषदे करून दर सोमवारी व गुरुवारी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येतो याशिवाय नागरिकांनी काटकसरीने पाणी वापरावे असा सल्ला नागरिकांना नगरपरिषदेच्या वतीने देण्यात येतो मात्र रत्नागिरी नगर परिषदेच्या पाईपलाईन मधूनच सध्या लिकेजमुळे पाणी रस्त्यावर येऊन फुकट जात आहे त्यामुळे नागरिकांना काटकसरीचा सल्ला देणाऱ्या नगर परिषदेने स्वतः काटकसरीची काळजी घ्यावी अशी नागरिकांची भावना आहेwww.konkantoday.com