
उच्च शिक्षण घेण्यासाठी परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना कोरोना लशीचा दुसरा डोस २८ दिवसांनंतर देण्यात येणार
उच्च शिक्षण घेण्यासाठी परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना कोरोना लशीचा दुसरा डोस २८ दिवसांनंतर देण्यात येणार आहे. यामध्ये टोकियो येथे होणाऱ्या ऑलिम्पिक्ससाठी जाणारे स्पर्धक, खेळाडू यांचाही समावेश करण्यात आला असून त्यांनाही २८ दिवसानंतर दुसरा डोस दिला जाणार आहे. दुसरा डोस घेण्यासाठी ८४ दिवसाची मर्यादा ठेवण्यात आली होती, मात्र त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे प्रदेशातील शिक्षण आणि त्यांचे प्रवेश अडचणीत येणार असल्याचे समोर आले होते
www.konkantoday.com