तीन दिवस सुट्ट्या भोगून झाल्यावर चौथ्या दिवशी कामकाजाच्या वेळात रत्नागिरी शहरात महावितरणाचे विजेचे शटडाऊन
_गेले तीन दिवस लागोपाठ आलेल्या सुट्यामुळे शासकीय कार्यालय बंद होती त्यामुळे आता तीन दिवस सुट्ट्या नंतर सरकारी कार्यालयात सामान्य लोकांनी आपल्या कामासाठी गर्दी केली होती मात्र महावितरणाने नेहमीप्रमाणे सोमवारी आपल्या हक्काचा वार असल्याचे समजून रत्नागिरी शहरात शट डाऊन केले त्यामुळे शहरातील वीज पुरवठा बंद होता त्यामुळे कार्यालयात कामकाज करण्यासाठी आलेल्या लोकांचे हाल झाले सध्या सरकारी कार्यालयातील कामकाज संगणद्वारे चालते काही ठराविक कार्यालयातच विजेला जनरेटर किंवा इन्वर्टर सारखे पर्याय आहेत मात्र ते नेहमीच्या क्षमतेने चालत नाहीत त्यामुळे कामकाज ठप्प होते याबाबत सोमवारी विद्युत प्रवाह खंडित करू नये याबाबत लोकप्रतिनिधीं पर्यंत वारंवार हा विषय नेण्यात आला मात्र त्याची दखल घेण्यास कुणालाही वेळ नाही एकीकडे आजपासून विजेच्या बिलात दरवाढ होणार असून सामान्य नागरिकांना त्याचा फटका बसणार आहे त्यातच महावितरणाकडून मेन्टेनन्स साठी सोमवारी विद्युत पुरवठा खंडित केला जातो असे कारण सांगितले जाते मात्र नागरिकांनी कामकाजाच्या वेळेत सोमवार पेक्षा शनिवारी ज्या काळात कार्यालयांना सुट्टी असते त्या काळात शट डाऊन करावे अशी नागरिकांची मागणी आहे पण त्याकडे दुर्लक्ष केले जात आहेwww.konkantoday.com