
कै. प्र. ल. मयेकर कथा लेखन स्पर्धा २०२५ – बक्षीस वितरण सोहळा
आज हॉटेल विवेक, रत्नागिरी येथे महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे – शाखा रत्नागिरी आणि उदय सामंत प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कै. प्र. ल. मयेकर कथा लेखन स्पर्धा २०२५ चा बक्षीस वितरण सोहळा राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
आजच्या सोशल मीडियाच्या युगात प्रत्येकजण लेखक झालेला आहे; पण हाताने लिहिण्याची आणि विचार मांडण्याची ताकद वेगळीच असते. ही स्पर्धा त्या परंपरेला पुढे नेणारी ठरली.
कोकण आणि विशेषतः रत्नागिरीला साहित्य, नाट्य, कला यांचा समृद्ध वारसा लाभला आहे. भविष्यातील पिढीने ही परंपरा जपत नवे लेखक घडवावेत, हेच या स्पर्धेचं सार्थक. या उपक्रमामुळे रत्नागिरीचं नाव “चांगल्या लेखनाचं केंद्र” म्हणून ओळखलं जाईल, असा मला विश्वास आहे. आयोजक, परीक्षक, सहभागी आणि विजेत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो, असे यावेळी बोलताना मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी म्हटले.
या प्रसंगी चंद्रकांत देशपांडे, प्रकाश देशपांडे, समीर इंदुलकर, राजू लिमये, शिल्पाताई सुर्वे आदी मान्यवर तसेच स्पर्धक उपस्थित होते.




