
माजी मुख्यमंत्रीअशोक चव्हाण यांचा ताफा गावकऱ्यांनी अडवला; दगडफेक करण्याचा प्रयत्न!
* माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण हे भाजप उमेदवाराच्या प्रचारार्थ अर्धापुर तालुक्यातील कोंढा येथे गेले असता गावकऱ्यांनी त्यांचा ताफा अडविला. गावकऱ्यांचा रोष पाहून अशोकराव चव्हाण यांना माघारी परतावे लागले.गाड्या परतल्यानंतर त्यावर दगड फेक करण्याचाही प्रयत्न काही तरुणांनी केला.माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभा सदस्य अशोकराव चव्हाण हे महायुतीचे उमेदवार खासदार प्रतापराव चिखलीकर यांच्या प्रचारासाठी कोंढा येथे सोमवारी गेले असता त्यांना गावकऱ्यांच्या रोषाचा सामना करावा लागला. गावात एन्ट्री करताच त्यांचा ताफा गावकऱ्यांनी आडविला. यावेळी एक मराठा लाख मराठा अशा घोषणा तरुणांनी दिल्या. यावेळी अशोकराव चव्हाण यांना जाब विचारण्याचा प्रयत्न काही तरुणांनी केला. त्यावेळी पोलिसांनी जमा पांगविण्याचा प्रयत्न देखील केला. परंतु गावकऱ्यांचा रोष वाढत असल्याचे पाहून अशोकराव चव्हाण यांनी माघारी परतण्याचा निर्णय घेतला. www.konkantoday.com