
शाळांमधील १८ वर्षाखालील विद्यार्थी आता निवडणूक प्रक्रियेत स्वयंसेवक
_निवडणूक प्रक्रियेत प्रशासन विविध स्तरातील नागरिकांचा सहभाग या ना त्या प्रकारे करून घेत असते. मात्र या लोकसभा निवडणुकीत आता शाळेतल्या एनएसएस, एनसीसी आणि स्काऊट गाईडच्या विद्यार्थ्यांचा सहभाग असणार आहे. या १८ वर्षाखालील विद्यार्थ्यांना आता निवडणुकीसाठी स्वयंसेवक म्हणून नेमण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. जिल्ह्यातील विविध शाळांमधील एनसीसी, एनएसएस आणि स्काऊट गाईडच्या विद्यार्थ्यांची यादी जिल्हा प्रशासनाकडून मागवण्यात आली आहे.रत्नागिरी जिल्ह्यातही लोकसभा निवडणूक-२०२४ साठी आता प्रशासन सज्ज झाले आहे. विविध मतदान केंद्रांची पाहणी, संबंधित प्रक्रियेत सहभागी असलेल्या शासकीय कर्मचार्यांचे प्रशिक्षण अशी लगबग सुरू आहे. अशातच प्रत्यक्ष निवडणुकीवेळी प्रत्येक मतदान केंद्रावर आता १८ वर्षाखालील विद्यार्थी स्वयंसेवक म्हणून काम पाहणार आहेत. निःपक्षपाती आणि पारदर्शक मतदान प्रक्रियेत या विद्यार्थ्यांना महत्वाची कामगिरी देण्यात येणार आहे.www.konkantoday.com