जिल्ह्यात ६२ कि.मी. चौपदरीकरण शिल्लक
गेल्या अनेक वर्षापासून रखडलेल्या आणि कोकणी जनतेच्या टीकेचे लक्ष्य बनलेला मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम तळकोकणातील चौपदरीकरण पूल, उड्डाणपूल वगळता आता अंतिम टप्प्यात आले आहे. रत्नागिरी जिल्ह्यात एकूण १९८.४२ कि.मी.अंतरातील १३५.६५५ कि.मी.चे चौपदरीकरण पूर्ण झाले असुन आता अवघे ६२ कि.मी. चे चौपदरीकरण शिल्लक राहिले आहे. रखडलेल्या चौपदरीकरणात संगमेश्वर, रत्नागिरी टप्प्याचा समावेश असून सध्या कंत्राटदार बदलल्यानंतर तेथेही कामे वेगाने सुरू करण्यात आली आहेत. मात्र दोन अपूर्ण पुलांसह पाच उड्डाणपूल पूर्ण होण्यास पुढील दीड ते दोन वर्ष लागणार आहेत.www.konkantoday.com