
राज्यात GBS चा पहिला बळी, पुण्यातील तरुणाला गमवावा लागला जीव.
पुण्यामध्ये गुलियन बॅरी सिंड्रोम या आजारामुळे एका तरुणाला जीव गमवावा लागला आहे. पुण्यात राहणाऱ्या सोलापूरच्या एका तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.त्यामुळे पुणेकरांची चिंता वाढली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात. समोर आलेल्या माहितीनुसार, मूळचा सोलापूर जिल्ह्यातील असणाऱ्या एका तरुणाला गुलियन बॅरी सिंड्रोम या आजारामुळे जीव गमवावा लागला आहे. हा तरुण पुण्यातील धायरी परिसरात असणाऱ्या डीएसके विश्व या ठिकाणी राहत होता.
या तरुणाला काही दिवसांपूर्वी गुलियन बॅरी सिंड्रोम या आजाराची लागण झाली होती. यानंतर तो सोलापूरच्या एका खासगी रुग्णालयात उपचार घेत होता व या आजारातून सावरला होता.पुण्यात सध्या 73 रुग्ण काही दिवसांनंतर या तरुणाला अतिदक्षता विभागातून बाहेर काढण्यात आले होते.
मात्र पुन्हा श्वासनाचा त्रास झाल्याने आणि प्रकृती आणखी खालवल्यामुळे त्याला उपचारासाठी पुण्यामध्येहलवण्यात आले होते. मात्र आता पुण्यातील रुग्णालयामध्ये उपचार घेत असताना या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पुण्यात सध्या या आजाराची लागण झालेले 73 रुग्ण आहेत. यातील 14 जण व्हेंटिलेटरवर आहेत.